गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेमध्ये विद्यार्थी स्वागत समारंभ संपन्न
छत्रपती संभाजीनगर : गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेमध्ये दि.०३/१०/२०२३ रोजी संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे संचालक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. आर. एस. सोळुंके सर आणि डॉ. भारत खैरणार सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भगवान साखळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आपले यश मिळवावे, कायम सकारात्मक विचार ठेऊन मार्गक्रमण करावे, याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्थेबाबत प्रारंभीक माहिती सांगितली. डॉ. आर. एस. सोळुंके यांनी ग्रामीण विकास आणि सद्य:स्थिती तसेच संशोधनासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागाची सद्यस्थिती यावर आपले विचार मांडले. डॉ. भारत खैरणार यांनी विद्यार्थ्यांनी अध्ययन करून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करावा याबाबत मार्गदर्शन केले.
प्रतीक्षा ओंकार आणि उगम खिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले तसेच अतुल थोरात याने आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सस्थेतील सर्व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.