पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
समाजोपयोगी व कौशल्यावर आधारित संशोधनावर भर द्या – कुलगुरु प्रा महानवर
सोलापूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये विद्यार्थी केंद्रीत व कौशल्यपूरक शिक्षणाचा विचार केला आहे. समाजाला उपयोगी पडणाऱ्या संशोधनाची आज गरज आहे. त्यामुळे समाजोपयोगी तसेच कौशल्य विकासावर आधारित संशोधनावर अध्यापक व संशोधकांनी भर द्यावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलात पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियाना अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये समाजाचा सहभाग आणि कौशल्य व रोजगाराचा दृष्टीकोन या विषयावर एक दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु प्रा डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्त करण्यात आले. यावेळी डॉ महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तुळजापूर येथील टाटा सामजिक शास्त्र आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ बाळ राक्षसे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ प्रभाकर कोळेकर, डॉ ज्ञानेश्वरी हजारे, डॉ श्रीनिवास भंडारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरु महानवर म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू समोर ठेवून अभ्यासक्रमांची मांडणी केली आहे. विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विविध कौशल्य विकशीत होतो. त्यामुळे आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातुन संशोधन आणि शिक्षण होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार आहे. यावेळी डॉ बाळ राक्षसे म्हणाले, प्रत्येक भारतीयाने विकशित भारतासाठी काम केले पाहिजे, योगदान दिले पाहिजे. हे योगदान देताना तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा विचार होणे आवश्यक आहे. त्याला उपदेश करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या विकासासाठी आपण काय करतो, हे महत्वाचे आहे. या कार्यशाळेत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलटिक्स आणि इकॉनामिक्सचे डॉ प्रकाश व्हनकडे, डॉ प्रभाकर कोळेकर यांनी ही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी डॉ ए के भासके, व्ही के खडाखडे, एस एस नश्ते, डॉ टी आर कांबळे, डॉ एच ए शेख, डॉ एम डी जक्कन, डॉ एस आर पाटील, एस जी राठोड, डॉ एस पी शिंदे, एच एस शिंगे, आर बी म्हामणे, आर व्ही मंडलिक, डॉ एस पी काळे, ए आर पांढरे, व्ही बी एडाके, आर जी भोसले, डॉ व्ही एच भोसले आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.