मिल्लीया महाविद्यालयात राज्यस्तरीय दुर्लक्षित क्रांतिकारी शोध निबंध वाचन स्पर्धा संपन्न

बीड : येथील मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे दुर्लक्षित क्रांतिकारी शोधनिबंध वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतिकारी ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, इतिहासामध्ये त्यांच्या जीवनकार्याचे व्यवस्थित वर्णन आहे परंतु त्यांचे कार्य लोकांना माहीत नाही अशा भारतीय दुर्लक्षित क्रांतीकारकाविषयी त्यांचा जन्म, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना ही माहिती प्रकाशात आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला व आपला शोध निबंध पाठवला होता. ऑनलाईन या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

Advertisement
State Level Neglected Revolutionary Research Essay Reading Competition Concluded in Millia College beed

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.शेख कलीम मोहियोद्दीन यांनी केली त्यांनी सांगितले की एक दुर्लक्षित क्रांतिकारी मौलाना हबीऊर  रहमान लुधियानवी यांनी असहकार आंदोलन व खिलाफत आंदोलनात भाग घेतला होता त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला आणि विशेष म्हणजे शहीद भगतसिंग यांना त्यांनी खूप सहकार्य केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजिल यांनी सांगितले की ही स्पर्धा आम्ही दुर्लक्षित क्रांतीकारकांच्या कार्यांना प्रकाशात आणण्यासाठी दरवर्षी याचे आयोजन करतोत. कु.अलीना फातेमा या स्पर्धक विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले.पारितोषिक वितरणाची घोषणा प्राध्यापक शेख नईम यांनी केली. प्रथम पारितोषिक कु.अलीना फातेमा द्वितीय कु.महेक शेख रहीम तृतीय कु. शेख अमरीन व कू. महवीश जबीन तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक कू. नंदिनी भाऊसाहेब हिला देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.शेख कलीम मोहियोद्दीन यांनी तर आभार डॉ. शेख हुसेन इमाम यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील, उपप्रचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्रचार्य डॉ. हुसैनी एस.एस.यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page