देवगिरी महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित
देवगिरीचा रासेयो स्वयंसेवक मुनाफ पठाण यास ‘राज्य पुरस्कार’ तर वैभवी तवर हिची राष्ट्रीय स्तरावर संघप्रमुख म्हणून निवड
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक मुनाफ लतीफ पठाण यांस महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक’ हा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेवक वैभवी तवर ह्या स्वयंसेवक विद्यार्थिनीची लाल किल्ला नवी दिल्ली येथील स्वतंत्र दिन समारंभासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या विशेष अतिथी सवांदासाठी संघप्रमुख म्हणून निवड झाली आहे.
या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, डॉ रवी पाटील, डॉ विष्णू पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समन्वयक डॉ सोनाली क्षीरसागर, महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ अनंत कनगरे, डॉ भाऊसाहेब शिंदे, डॉ सुवर्णा पाटील यांनी अभिनंदन केले तसेच या यशाबद्दल दोन्ही स्वयंसेवकांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणार्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव व्हावा म्हणून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीचे रासोयोत विशेष महत्व असते.