स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महिला दिना निमित्त सोमवारी व्याख्यानाचे आयोजन

विद्यापीठातील सफाई कामगार महिलांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान

नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने दि. ११ मार्च रोजी नाशिक येथील प्रसिद्ध साहित्याभ्यासक डॉ. विद्या कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

SRTMUN-Nalanda-Gate-2

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांची उपस्थिती राहणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या सभागृहात दु.१२:०० वा. व्याख्यान होणार आहे. यावेळी विद्यापीठातील सफाई कामगार महिलांचा कुलगुरू डॉ. चासकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com