स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय वाचन दिन उत्साहात साजरा
आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ मनोहर चासकर
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्रामध्ये राष्ट्रीय वाचन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व केरळ ग्रंथालय चळवळीचे जनक पी एन पन्नीकर यांच्या प्रतिमेस चंदनहार व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी राष्ट्रीय वाचन दिनाची शपथ दिली.
याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ मनोहर चासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आई- वडिलांच्या चरित्र वाचनातून वाचन प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. वाचनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचावेत असा त्यांनी सल्ला दिला. ग्रंथालयांचे स्वरूप बदलत असून आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना हवे ते साहित्य सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध करून द्यावे लागेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदीश कुलकर्णी यांनी केले. जी एन लाटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ आर डी काळे, डॉ ए बी हंबर्डे, व्ही एन मोरे, एस ए डहाळे, खाजामिया सिद्दीकी, एम जी पुजारी, एम एस लुटे, डी एस पोपळे, पी डी भुसारे, पी एस बडगे, वाय व्ही हंबर्डे यांनी प्रयत्न केले. भारत सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन राष्ट्रीय वाचन दिनाची शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्या दृष्टीने संबंधित संकेतस्थळाचा क्यू आर कोड विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला.