‘स्वारातीम’ संलग्नित महाविद्यालयांनी स्पर्धेसाठी ३१ जुलै पर्यंत वार्षिकांक पाठवावेत

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयातून प्रकाशित होणाऱ्या वार्षिक अंकात विद्यार्थ्यांच्या प्रज्ञा, प्रतिभेचे प्रतिबिंब असते. त्यातून विद्यार्थ्यांच्या भावना, विचार, कल्पना व नवनिर्मितीला चालना मिळते. म्हणून प्रत्येक महाविद्यालयांनी वार्षिक अंक नियमित प्रकाशित करणे आवश्यक आहे.

Advertisement
SRTMU Nanded

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दरवर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ उत्कृष्ट वार्षिक अंकास रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येते. तरी विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ चा वार्षिक अंक एकूण पाच प्रतीत दि ३१ जुलै पर्यंत विद्यार्थी विकास विभागात सादर करावा. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page