‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला ई-समर्थ या केंद्र शासनाच्या प्रणाली ने सुरुवात
नांदेड : विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकङून भारतातील सर्वच विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून भारत सरकारने तयार केलेल्या ई-समर्थ या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी निर्देश दिले होते. त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील तज्ञ समिती मागील दोन महिन्यापासून काम करीत होती. ती संगणकीय प्रणाली आता विद्यापीठाने पूर्णत्वास नेली आहे.
विद्यापीठ मुख्य परिसर, लातूर, परभणी व किनवट येथील उपपरीसर व न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील सर्व अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश प्रक्रिया या नव्याने विकसित केलेल्या ई -समर्थ संगणकीय प्रणाली द्वारे होणार असून त्याचे औपचारिक उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ डी एम खंदारे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ पराग खडके, प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ अशोक कुंभारखाने, ई-समर्थ नोडल अधिकारी डॉ रवि एन सरोदे, डॉ सुरेंद्रनाथ रेड्डी, मेघश्याम साळुंके, अजय दर्शनकार, शिवलिंग पाटील व सर्व संकुलाचे संचालक उपस्थित होते.
यासाठी एक क्यू-आर कोड व वेबलिंक तयार करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे आहे.