उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची गेट – २०२४ परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील बी टेक (केमि. इंजि.) च्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या भारतीय विज्ञान संस्था बंगळूर आयोजित गेट-२०२४ परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. भारत सरकारमधील विविध संस्था व उपक्रमे जसे की एनपीसीएल, ओएनजीसी, आयवोसीएल, बीएआरसी, बीपीसीएल, आरसीएफ यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी तसेच आय आय टी व एन आय टी येथील अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर प्रवेशासाठी गेट परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक आहे.

Advertisement

रसायन तंत्रज्ञान संस्थेतील मनोज भामरे यास अ भा रँक २६०, मोहीत चौधरी यास ५२६, प्रिया चिंचमालकर हिस ५८४, अथर्व  निमूडकर यास ६१६ तर सुनील जावळे यास १०७७ मिळाले असून हे विद्यार्थी गेट – २०२४ परीक्षा उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा जे बी नाईक, गेट परीक्षाचे समन्वयक डॉ तुषार देशपांडे, तसेच संस्थेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page