शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश केंद्रात नागरिकांना अवकाश निरीक्षणाची संधी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये (दि. ९) रात्री ८ ते १२ वा. या कालावधीत अवकाश निरीक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या अवकाश निरीक्षणांतर्गत निरभ्र आकाशामुळे विविध ग्रह, तारे, तारकासमूह आदी पाहता येऊ शकणार आहेत. इच्छुक विद्यार्थी, नागरिक यांच्यासाठी येथे मुक्त प्रवेश आहे. या संधीचा अवकाशप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.