पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणार
डॉ प्रकाश महानवर यांनी दिली माहिती
कॉमनवेल्थ कराटे स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भुवनेश्वरी जाधवचा सत्कार
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी विशेष तरतूद तयार करत आहे. याबाबतची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली. ते दक्षिण आफ्रिकेतील दर्बन येथे झालेल्या अकराव्या कॉमनवेल्थ कराटे स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भुवनेश्वरी जाधव हिच्या सत्काराच्या वेळी बोलत होते.
सोलापूर विद्यापीठ, महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना आर्थिक मदत पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा देवानंद चिलवंत, प्रा सचिन गायकवाड, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा संचालक अतुल लकडे, बालाजी अमाईन्सचे मल्लिनाथ बिराजदार, सिनेट सदस्य डॉ वीरभद्र दंडे, परीक्षा संचालक डॉ श्रीकांत अंधारे, डॉ व्ही बी पाटील आणि संकुलातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुवनेश्वरी जाधव हिच्या उल्लेखनीय यशामुळे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्राला नवा उच्चांक गाठण्याची प्रेरणा मिळाल्याचेही डॉ महानवर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळाल्यास त्यांचे प्रोत्साहन वाढेल आणि त्यांना अधिक यश प्राप्त होईल, अशी आशा डॉ महानवर यांनी व्यक्त केली.