पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे मंगळवारी सेट-नेट पेपर एक संदर्भात कार्यशाळा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विशेष कक्ष विभागाच्यावतीने सेट- नेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक एक करिता मंगळवार, दि 18 मार्च 2025 रोजी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी, सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे सभागृहात या सेट-नेट प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेत डॉ शशिकांत शिंदे, सोलापूर, डॉ कृष्णा पाटील, कोल्हापूर, डॉ ब्रिजमोहन दायमा, लातूर, डॉ सारिका दायमा, लातूर हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
सेट-नेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर क्रमांक एकच्या मार्गदर्शनासाठी मोठ्या संख्येने विद्यापीठात उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले आहे.