नांदेड क्रीडा महोत्सव 2025 मध्ये सोलापूर विद्यापीठाचा दबदबा; 13 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद
नांदेड : येथे झालेल्या 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने चमकदार कामगिरी करत 13 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या यशस्वी खेळाडूंचा सत्कार कुलगुरू मा. प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरुष विभागाने 8 सुवर्ण, 3 रजत आणि 2 कांस्य पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले, तर महिला विभागाने 2 सुवर्ण आणि 2 रजत पदकांची कमाई केली. संघाचे मार्गदर्शक डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण चोकाककर आणि व्यवस्थापक धनंजय देशमुख यांचेही योगदान उल्लेखनीय राहिले.

कुलगुरूंनी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्याचे आवाहन केले व विद्यापीठाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बाळासाहेब वाघचवरे यांनी केले, तर आभार श्री. शिवानंद मैलारी यांनी व्यक्त केले.
