सर ज.जी. समूह परिचर्या महाविद्यालयाने केले मासिक पाळी स्वच्छता पथनाट्य सादरीकरण
मुंबई – नवरात्री पर्वाचे औचित्य साधत सर ज.जी. समूह परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पडघा येथील आश्रम शाळेत मासिक पाळी मध्ये कशी काळजी घ्यायची याविषयी पथनाट्याद्वारे, प्रात्यक्षिकेदाखून जनजागृती केली. डॉ. कुलकर्णी यांनी मासिक पाळी विषयी सविस्तर माहिती सांगितली. नीता धुरी सॅनिटरी पॅड कसा वापरावा, हे प्रात्यक्षिकातून दाखविले. पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण मासिक पाळी विषयी माहिती दिली.

तसेच या दरम्यान योगा प्रात्यक्षिके दाखवली. परिचर्या महाविद्यालय यांच्या तर्फे सॅनिटरी पॅडचे वाटप केले. मासिक पाळी अभियान करत असताना सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे, प्राचार्या डॉ. अपर्णा संखे, विद्यार्थी समन्वयक हेमलता गजबे, नीता धुरी, विश्राम कुलकर्णी तसेच आश्रम शाळेतील प्राचार्य पाटील , समाजसेवक केकाण तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.