बीडचा मध्यम वर्गीय कुटुंबातील शुभम शिरसट सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
बीड : गणेश शिरसट यांचे चिरंजीव अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सी ए फायनल परिक्षेत बीडचा मध्यम वर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शुभम गणेश सिरसट याने मे-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सी ए फायनल परिक्षेत दोन्ही ग्रुप एकाच वेळी घेऊन अत्यंत कमी वयात वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल पुणे येथे त्यांचे पी जी भागवत (एल एल पी, पुणे तर्फे हार्दिक अभिनंदन केले आहे.
शुभम सिरसट यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथून २०१७ साली पूर्ण केले असून पुढील शिक्षण त्यांनी पी जी जोग कॉमर्स कॉलेज, कोथरूड, पुणे येथे बी कॉम ची पदवीसुद्धा विषेश प्राविण्यासह पुर्ण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी मित्र, शिक्षक व आई वडील यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या यशाबद्दल बीड येथील शिरसट परिवाराचे हितचिंतक डॉ राजाभाऊ माने व त्यांचे सहकारी मित्र यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.