मुक्त विद्यापीठ गणेश मंडळाची श्रीगणेश महाआरती पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते संपन्न
मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाचा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा – पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गणेश मंडळातर्फे आयोजित मानाची श्रीगणेश महाआरती नाशिक ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच सकाळची महाआरती सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना पोलिस अधिक्षक देशमाने म्हणाले की बदलत्या काळानुसार व बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार मुक्त विद्यापीठाने देखील काही नविन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहे, काही प्रस्तावित आहेत. तसेच काही अभ्यासक्रम हे अद्ययावत केले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो आहे. भविष्यातही महाराष्ट्रातील पिढी घडविण्याच्या कामात व महाराष्ट्राच्या विकासात मुक्त विद्यापीठ आपले महत्वपुर्ण योगदान निश्चितपणे देत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत विद्यापीठाचा लाभ पोहचविण्याचा दृढ निश्चय आपण या गणेश उत्सवानिमित्त करू या असे उपस्थित सर्वांना आवाहन केले.
यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा गणेश मंडळाच्या अध्यक्ष प्रा संजीवनी महाले, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, तसेच सर्व विद्याशाखांचे संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलसचिव दिलीप भरड यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी प्रमुख अतिथि यांचे स्वागत केले.