श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा श्री क्षेत्र कपिलधार येथे समारोप संपन्न
बीड : श्री बंकट स्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष युवक युवती शिबिर श्री क्षेत्र कपिलधार येथे संपन्न झाले या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश भोसले सहसचिव श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकी घाट तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, शिवशंकर आप्पा भुरे श्री मन्मथस्वामी देवस्थान पंचकमिटी प्रमुख मार्गदर्शक सोनिया हंगे (वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बालविवाह निर्मूलन प्रकल्प जिल्हा बीड) महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शिबिर समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्त्या सोनिया हंगे यांनी बालविवाह निर्मूलन या अभियानाविषयी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांशी सविस्तर असा संवाद साधला आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होताना दिसून येतात याचे परिणाम इतके भयानक आहेत याचा आपण विचार देखील करू शकत नाहीत एखाद्या लेकराचे बालपण हिरावून घेणे त्याच्यावर नको त्या जबाबदाऱ्या लादणे एक प्रकारे समाजामध्ये लागलेली ही एक कीड आहे. आणि ही कीड समाजातून दूर करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सारख्या विभागातील स्वयंसेवकच हे काम करू शकतात कारण ज्या ठिकाणी समाजामधील निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन कार्य केले जाते त्याच ठिकाणी अशा प्रश्नांना योग्य पद्धतीने समाजामध्ये मांडणे व समाजाचे मत परिवर्तन करण्याचे काम आजचा युवक युवती करू शकते यात शंका नाही.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या नात्यांमध्ये आपल्या गावामध्ये अशा घटना घडत असतील तर आपण तात्काळ पोलीस प्रशासनाला 1098 या नंबर वर कळवावे आणि आपण या टोल फ्री क्रमांक वर योग्य ते लोकेशन योग्य ती माहिती दिल्यास आपले नाव देखील गोपनीय राहते म्हणजे माहिती देणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही मात्र समाजातील एक चुकीची घटना थांबवण्याचे काम होऊ शकते म्हणून अशा घटना टाळता येतील. एक चांगला समाज निर्माण करण्याचे काम आपण सर्व मिळून केले पाहिजे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी काय अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागात खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास या शिबिराच्या माध्यमातून केला जातो तसेच श्रम संस्कार देखील या शिबिरामध्ये केले जातात नेतृत्व गुण, सामाजिक भान, समूह जीवन अशा अनेक विविध टप्प्यातून या सात दिवशी शिबिरातून स्वयंसेवक एक चांगला नागरिक तयार केला जातो आणि ह्या शिबिरामध्ये अशा स्वरूपाचे काम झाल्याचे समाधान त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. विविध स्वयंसेवकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम त्यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उत्कृष्ट स्वयंसेवक नागेश मोरे, वैभव घोडके, अमर घोडके, स्वप्नील सदरे, करण वळकुंडे, आर्यन आतकरे, सुजल गायकवाड तसेच प्रतिभा शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक पेन बक्षीस देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश कोंका यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ मनोजकुमार नवसे यांनी मांनले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ मनोज कुमार नवसे, डॉ. शंकर शिवशेट्टे डॉ. प्रकाश कोंका, प्रा. राजाभाऊ नागरगोजे प्रा. रणजीत आखाडे, अर्जुन निंबाळकर, अब्दुल शेख यांनी परिश्रम घेतले.