श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे सात छात्र भारतीय सैन्यात भरती
बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील सात छात्र सैनिक नुकतेच भारतीय सैन्यात भरती झाले यामध्ये कॉर्टरमास्टर अप्पासाहेब चव्हाण, ज्युनियर अंडर ऑफिसर अनिकेत कांबळे, कार्पोलर आदित्य आमटे, लान्सकार्पोलर गणेश डिडूळ, कार्पोलर पवन थोरवे, कॅडेट शिवाजी खवणे, कॅडेट अशोक आघाव या सर्वांचा सहभाग आहे. श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील एनसीसी विभागाची गौरवशाली परंपरा आहे. आत्तापर्यंत भारतीय सैन्यामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सैनिक म्हणून या विभागांनी प्रशिक्षण देऊन विद्यार्थी तयार केलेत.
दरवर्षी या विभागातील पंधरा ते वीस विद्यार्थी भारतीय सैन्यांमध्ये भरती होतात याचे प्रमुख कारण म्हणजे महाविद्यालयाकडून पुरवले जाणारी सुविधा तसेच प्रशिक्षण यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांचा नेहमी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण कौशल्य आहेत त्यानुसार आपण प्रशिक्षण देऊन वेळप्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र क्लास घेऊन त्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महाविद्यालयातील विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील ग्रामीण भागातील शेतकरी यांची मुलं असतात म्हणून ही मुलं तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, आर्मी, नेव्ही, एस आर पी, बी एस एफ, सी आय एस एफ अशा अनेक ठिकाणी असणाऱ्या नोकरीच्या संधी व त्या साठी लागणारे प्रशिक्षण देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी एनसीसी विभागाचे कॅप्टन डॉ जगन्नाथ चव्हाण हे नेहमी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत.
याही वर्षी एकाच वेळी या विभागाचे सात विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून ही गौरवाची बाब आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेषता बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगाराची नोकरीची निकडीची गरज असते म्हणून या विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाचे शासकीय नोकरीमध्ये दाखल होण्याची संधी या महाविद्यालया मार्फत उपलब्ध करून दिली जाते. ही बाब महाविद्यालयासाठी व महाविद्यालयातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गौरवाची आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी व्यक्त केले. तसेच एनसीसी विभागाचे याप्रसंगी कौतुक केले व जे विद्यार्थी सैन्यामध्ये भरती झालेत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देण्याच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा ब्रह्मनाथ मेंगडे एनसीसी विभागाचे कॅप्टन डॉ जगन्नाथ चव्हाण व प्रशासकीय कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.