डॉ जे जे मगदूम फार्मसी महाविद्यालयात ‘माझी वसुंधरा अभियान’ श्रमसंस्कार शिबिर संपन्न

जयसिंगपूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन तरुण पिढीमध्ये समाजसेवेची भावना निर्माण करणे. तसेच आपण ज्या समाज्यात राहतो त्या समाज्याचे आपण काहीतरी देणे लागतो हा ध्यास निर्माण करणे हेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण शिकतो असे प्रतिपादन डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूरचे प्राचार्य डॉ शितलकुमार एस पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उ‌द्घाटना प्रसंगी केले. डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट चे डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर व उदगाव ग्रामपंचायत उदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उदगाव ता. शिरोळ या ठिकाणी ‘माझी वसुंधरा अभियान’ हे सात दिवसीय निवासी विशेष श्रम संस्कार शिबिर संपन्न झाले.

या शिबिराच्या उ‌द्घाटना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल उर्फ सावकार मदनाईक, (माजी बांधकाम सभापति, पंचायत समिति, शिरोळ) तसेच सरपंच मेघराज वरेकर, उपसरपंच अरुण कोळी, माजी उपसरपंच सौरभ पाटील, ग्रामविकास अधिकारी अनिल बीडगर व ईतर ग्रामपंचायत सदस्य उपथित होते. या शिबिरात चे डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेने दत्तक घेतलेल्या उदगाव गावामध्ये जलसंवर्धन योजना, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पथनाट्य, सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण, महिला आरोग्य व व्यवस्थापन तसेच प्रबोधनात्मक जनजागृती असे विविध उपक्रम राबविले. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी लोककल्याणकारी राज्य घडवूया, विकसनशील भारत, स्त्री आरोग्य, शेतकरी आणि पर्यावरण, योगातून आरोग्याकडे व काहीपान भारीदेवा आशा विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

गावामध्ये राबवलेल्या जलसंवर्धन योजनेसाठी आदित्य जाधव (जलसंवर्धन अधिकारी) यांचे सहकार्य लाभले. तसेच गावामधील सार्वजनिक ठिकाणे व मंदिरांची स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजने मार्फत करण्यात आली. गावामध्ये राबवलेल्या मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचा जवळपास 300 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात सार्वजनिक ठिकानांचे सुशोभीकरण करण्यात आले. यामध्ये गावातील शाळा व मंदिरांचा समावेश होता. या शिबिरांतर्गत जवळपास 60 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये मोहन कवठेकर व अर्चना कवठेकर यांनी योगाचे महत्व आणि योग यावर प्रात्यक्षिक दिले. गावातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्ती या विषयावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थाना व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले. या शिबिराचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळवंत हाके, ब्रम्हनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट (कुंजवण) चे अध्यक्ष संजय चौगुले, उपाध्यक्ष महावीर मगदुम, सदस्य सुशिलकुमार पाटील, उदगाव ग्रामपंचायत सदस्या सुनीता चौगुले, डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील, डॉ. सतीश किलजे, डॉ. प्रियंका गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रणिल तोरसकर हे उपस्थित होते.

हे शिबिर उस्फूर्तरित्या पार पाडण्यासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व व्हाईस चेअर पर्सन अडो. डॉ. सोनाली मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच आशा समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांना डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट नेहमीच पाठबळ व सहकार्य पुरवत राहील अशी ग्वाही दिली. तसेच या शिबिरास डॉ. जे. जे. मगदूम होमीओपॅथी कॉलेज, श्री ब्रम्हनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट (कुंजवण) चे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक सूरज परीट, उदगाव ग्रामपंचायत, उदगाव व सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. शितलकुमार एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रणिल तोरसकर, प्रा. साधना पुजारी, प्रा. सौरभ समडोळे, प्रा. रामलिंग माळी, प्रा. रोहण लाटवडे, प्रा. प्रतीक उगारे, प्रा. शुभम पाटील, प्रा. प्राजक्ता चौगुले, विद्यार्थी प्रतिनिधि प्रतीक कुन्नूरे, यश पाटील, रोहण सुतार व राष्ट्रीय सेवा योजना संयोजन समिति यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page