गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख उपस्थिती म्हणून स. प्रा. इतिहास विभाग डॉ. नंदकिशोर मने, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र प्रमुख तसेच कॉम्पुटर शास्त्र विभागाचे स. प्रा. डॉ. विकास चित्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलसिंचन व्यवस्थेवर व महाराजांच्या संपूर्ण नीती तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करत आजही त्यांचे कार्य प्रेरणदायी आहे, असे ते म्हणाले. डॉ. नंदकिशोर मने यांनी शिवाजी महाराज याच्या जयंती निमित्त महाराजांचा जीवन कार्यावर प्रकाश टाकला व सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच संपूर्ण सप्ताह हा विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन महाराजांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होत असल्यामुळे , विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करणार आहेत असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन स. उपकुसचिव डॉ संदेश सोनुले यांनी तर आभार गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतीश पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, सिनेट सदस्य डॉ. नरेश मडावी, अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.