श्री बंकटस्वामी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वकृत्वाने बहरला शिवजन्मोत्सव
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयात शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे तसेच प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे तसेच माजी उपप्राचार्य प्रा. बन्सी काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व वारकरी संप्रदायाचे श्री बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. नितीन चव्हाण यांनी शिवगर्जना सादर केली आणि या शिवगर्जनेने महाविद्यालयातील वातावरण दणाणून गेले. याप्रसंगी उस्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला तसेच प्राध्यापिका वर्षाताई भोसले यांनी देखील स्वरचित छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता सादर केली. त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. अमोल घोलप प्रा. युवराज महाडिक व संभाजी गायकवाड त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी स्वरचित पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे यांनी केले.
हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश दरवर्षी आपण वेगवेगळ्या व मान्यवरांना शाहिरांना आमंत्रित करतो परंतु यावर्षी आम्ही महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये वकृत्व गुण विकसित केलेले आहेत तसेच त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावे त्यांच्या नेतृत्वगुणाला विकास मिळावा तसेच महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे देखील कौतुक व्हावे या उद्देशाने यावर्षी शिवजयंतीला वक्ते न बोलता महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांना संधी देण्याचे काम या निमित्ताने करण्यात येत आहे आणि याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या तीन मूर्ती या बक्षीस म्हणून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यांसाठी देण्यात येणार आहेत आणि त्या सर्व मूर्ती ही महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वतीने बक्षीस म्हणून देणार आहोत असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील एकूण वीस स्पर्धक वकृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि अत्यंत जोश पूर्ण आणि अभ्यासपूर्ण वकृत्व शैली तसेच विचारांची परिवर्तन शैली दिसून आली यामध्ये प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महिलांविषयी धोरण पर्यावरण विषयी धोरण रयतेची काळजी तसेच स्वराज्य कसे असावे याविषयी अनेक वक्त्यांनी आपल्या वेगवेगळ्या उदाहरणादाखल माहिती दिली यामध्ये राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसा घडविला तसा आजच्या स्त्रीने देखील राजमाता जिजाऊचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना संस्कार द्यावेत, मोबाईल पासून दूर कसे ठेवता येईल, वाईट विचारांपासून कसे दूर ठेवता येईल याविषयी अनेकांनी छत्रपतींच्या जीवनातील उदाहरणे देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी आजपर्यंत माझ्या सेवेच्या कालखंडात सर्वोत्कृष्ट आनंदाचा क्षण असल्याचे मत व्यक्त केले. कारण विद्यार्थ्यांकडून अत्यंत जोशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे भाषण सादर झालेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित असणे हे निश्चितच महाविद्यालयासाठी गौरवास्पद आहे कारण आजचे युवक हे भविष्यातील नागरिक आहेत आणि हेच देशाला योग्य दिशा देण्याचे काम करतील कारण या ठिकाणी छत्रपतींच्या अनेक विचार हे त्यांनी अभ्यासपूर्ण आणि जोश पूर्ण मांडलेत तसेच याप्रसंगी एक भावनिक प्रसंग देखील एका विद्यार्थिनीं वाघमारे सोनाली ने व्यक्त केला तिने आपल्या भाषणात आरक्षणाविषयी मत मांडले मला आरक्षण जरी असले तरी माझी परिस्थिती फी भरण्याची नाही तरी देखील मला उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे आणि या महाविद्यालयाकडून मला नेहमीच सहकार्य मिळते आणि मला वकील व्हायचे आहे परंतु आई-वडील मला पुढील शिक्षणासाठी परिस्थितीमुळे शिकू देणार नसल्याचे तिने सांगितले हे ऐकल्याबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी तात्काळ या विद्यार्थिनीचा पुढील शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला आणि पुढील शिक्षणासाठी तुला जेव्हा जेव्हा फी ची गरज पडेल तेव्हा तेव्हा मला फोन कर तात्काळ तुझी फी माझ्यातर्फे भरण्यात येईल असे त्यांनी याप्रसंगी घोषित केले. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण व्हावे आणि एकमेकाला माणुसकी धर्म जपणे गरजेचे आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यानंतर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शेळके प्रतीक्षा द्वितीय क्रमांक गायकवाड अश्विनी तृतीय क्रमांक शिंदे पूजा यांना छत्रपती शिवाजी महाराज याचा पूर्णाकृती पुतळा बक्षीस म्हणून भेट देण्यात आला. प्रथम बक्षीस प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे दुतीय बक्षीस डॉ. शंकर धांडे तृतीय बक्षीस वर्षात भोसले व उत्तेजनार्थ छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे पुस्तक उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे यांच्यातर्फे सर्व सहभागी स्पर्धकांना देण्यात आले. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस मिळविणाऱ्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मुकुंद तेलप, डॉ. प्रकाश कोंका, डॉ. अनिकेत भोसले, डॉ महादेव जगताप डॉ. निता बावणे यांनी काम केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉ. राजीव काळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन इतिहास विभागाचे डॉ. बाबासाहेब जावळे यांनी मानले यानंतर मानसशास्त्र विभागाचे सुनील त्रिभुवन यांच्यातर्फे नाश्ता देण्यात आला या कार्यक्रमाच्याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.