शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर परीक्षा सुरु
शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२४ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि.२५-११-२०२४ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत.
कोल्हापूर : दि. 12–12–2024 रोजी B.A., B.COM. B.SC. M.A., M.COM. M.B.A., M.SC., B.B.A., B.C.A.,M.C.A., B.A.B.ED., B.TECH., L.L.B.,L.L.M. या सह विविध 121 अभ्यासक्रमांच्यापरीक्षा वर्णनात्मक पध्दतीने विविध 187 परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडल्या असून सदर परीक्षांसाठी 50376 विद्यार्थी उपस्थित होते.
आज दिनांक 12–12–2024 रोजी B.A. Film Making Sem.I, P.G. Diploma In Nutrition and Dietics Sem.I, P.G. Diploma in Nutrition and Dietics Sem.II, PGDCA Sem.I, PGDCA Sem.II या 5 अभ्यासक्रमांचे निकाल जाहिर झाले असून आजअखेर एकूण 15 निकाल जाहिर झाले आहेत.
या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत दि. 12 डिसेंबर, 2024 रोजी सदर पथकाकडून कोल्हापूर- 4 , सांगली- 1 व सातारा- 3 असे तीन जिल्ह्यातून एकूण 8 गैरप्रकाराची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे.