शिवाजी विद्यापीठाचा तायक्वांदो महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना
कोल्हापूर : गुरुनानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर, पंजाब येथे 12 ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा महिला तायक्वांदो संघ भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
या संघात श्रेया बराले (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर), मनस्वी भंडारी (एस जी एम, कराड), करुणा जाधव (विलीन्गडन कॉलेज, सांगली), भूमी शिंदे (डी डी शिंदे सरकार कॉलेज, कोल्हापूर), राजश्री सुतार (श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर), लक्ष्मी पाटील (डी के ए एस सी कॉलेज, इचलकरंजी), सानिका भट (महावीर कॉलेज, कोल्हापूर), आणि जान्हवी गलूगडे (श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली) यांचा समावेश आहे.
संघाच्या या कामगिरीसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शिर्के, प्र-कुलगुरू डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ शरद बनसोडे, चेअरमन डॉ भागवत, तसेच प्रा सुचय खोपडे यांनी प्रोत्साहन दिले आहे. संघाच्या प्रशिक्षक प्रा प्रमोद कुचिवाले आणि प्रा स्वाती शिरोटे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने तयारी केली आहे.
शिवाजी विद्यापीठाचा हा महिला तायक्वांदो संघ राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.