कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष आणि महिला संघांनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक जिंकले. या विजयाच्या पार्श्वभूमीवर, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

मंगलोर विद्यापीठाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील 247 विद्यापीठांचे पुरुष संघ आणि 107 विद्यापीठांचे महिला संघ सहभागी झाले होते. शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाने उल्लेखनीय कामगिरी करत, श्री प्रधान किरूळकर यांनी वैयक्तिक द्वितीय क्रमांक, श्री अभिषेक देवकाते यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर पुरुष संघाने 89 गुणांसह सांघिक चतुर्थ क्रमांक पटकाविला.

पुरुष संघातील खेळाडू:

  1. प्रधान किरूळकर
  2. अभिषेक देवकाते
  3. प्रवीण कांबळे
  4. उत्तम पाटील
  5. अंकुश हाक्के
  6. राहुल चव्हाण

महिला स्पर्धेत, शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने वर्चस्व राखत, सृष्टी रेडेकर यांनी वैयक्तिक पाचवा क्रमांक मिळवला, तसेच संघाने 64 गुणांसह सांघिक तृतीय क्रमांक पटकाविला.

Advertisement
Shivaji University Kolhapur University Vice Chancellor Dr. D. T. Shirke felicitates the players who won national cross country medals

महिला संघातील खेळाडू:

  1. सृष्टी रेडेकर
  2. वैष्णवी मोरे
  3. वैष्णवी रावळ
  4. गायत्री पाटील
  5. वैष्णवी सावंत
  6. सानिका नलवडे

सत्कार कार्यक्रमात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी खेळाडूंना शिस्त, सातत्य, नियोजनबद्धता आणि आगामी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ एथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी तयारी करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या क्रॉस कंट्रीमध्ये असलेला दबदबा कायम ठेवण्याबद्दल खेळाडू आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. बनसोडे, प्रशिक्षक प्रा. रामा पाटील, प्रा. प्रकुल पाटील मांगोरे, संघ व्यवस्थापक डॉ. सविता भोसले आणि प्रा. सुचय खोपडे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page