डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सौरवी कुरणेला शिवाजी विद्यापीठाचे गोल्ड मेडल
कसबा बावडा : डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सौरवी रमेश कुरणे या विद्यार्थिनीने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल मिळवले आहे. महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी या दहा गुणवत्ता यादीत टॉप – १० मध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे.
शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष आर्कीटेक्चर पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या गुणवत्ता यादीत सौरवी रमेश कुरणे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ऐश्वर्या एकनाथ धवन (चौथा), आर्यश शिवाजी संकपाळ (आठवा), रुची समीर जोशी व नक्षत्रा मिलिंद परुळेकर (नववा) व अपूर्वा राजेंद्र शिंगारे (दहावा) यांनी ‘टॉप – १०’मध्ये स्थान मिळवले आहे.
डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर हे पश्चिम महाराष्ट्रातातील एकमेव स्वायत्त आर्किटेक्चर महाविद्यालय असून गेल्या ४० वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपले वर्चस्व मिळवत आपली गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ लितेश मालदे, आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा इंद्रजीत जाधव व सर्व प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.