शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राची ०८ ऑगस्ट रोजी प्रवेशप्रक्रियेबाबत कार्यशाळा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ८६ अभ्यासकेंद्रातील समन्वयक व लेखनिक यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती संचालक प्रा डॉ डी के मोरे यांनी दिली.
बी ए, बी कॉम, एम ए, (मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास ), एम कॉम व एम एस्सी (गणित) या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दि ०८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वा केंद्रामध्ये कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. अध्यक्षस्थानी संचालक प्रा डॉ डी के मोरे असणार आहेत. यावेळी उपकुलसचिव व्ही बी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सिस्टीम प्रोग्रामर आशिष घाटे, समन्वयक डॉ के बी पाटील, सहा प्राध्यापक डॉ एम एम मुजावर, आय टी समन्वयक एन एन मुलाणी, संगणक चालक व्ही एम मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.
तरी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राच्या समन्वयक व लेखनिक यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे,असे आवाहन संचालक प्रा डॉ डी के मोरे यांनी केले आहे.