शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचा पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पीएच डी प्राप्त

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील इराकचे संशोधक विद्यार्थी फैसल फलिह फैसल यांना आज विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली. ते प्राणिशास्त्र विभागातून पीएच.डी. प्राप्त करणारे पहिले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ठरले आहेत.

Advertisement

फैसल यांनी ‘इफेक्ट ऑफ पिरिमिकार्ब ऑन फिंगरलिंग्ज ऑफ फ्रेशवॉटर फिश सिरिन्हिस मृगला’ (Effect of Pirimicarb on fingerlings of freshwater fish Cirrhinus mrigala) या विषयावर विद्यापीठास शोधनिबंध सादर केला. त्यांना प्राणिशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. माधव भिलावे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर शोधनिबंधावरील मौखिक परीक्षा आज झाली. यासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ. योगेश भुते उपस्थित होते. परीक्षेचे अध्यक्षपद प्रा. डॉ. शिवानंद यंन्कंची यांनी भूषविले. यावेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मंडळाचे समन्वयक प्रा. अनिल घुले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page