शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, पदार्थविज्ञान अधिविभागप्रमुख डॉ.आर.जी.सोनकवडे, डॉ.के.वाय.राजपूरे, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.एम.व्ही.टाकळे, डॉ.एन.एल.तरवाळ, डॉ.एस.पी.दास, संगणकशास्त्र अधिविभागाचे डॉ.व्ही.एस.कुंभार, डॉ.यु.आर.पोळ, डॉ.स्मीता काटकर, डॉ.शितल गायकवाड, डॉ.कबीर खराडे, प्रसाद गोयल, संभाजी कांबळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.