अमरावती विद्यापीठाचे उत्कृष्ट कलावंत, आदर्श विद्यार्थी (मुले-मुली) पुरस्कार जाहीर

ऋषिकेश दुधाने, दिव्या बासोले, वैष्णवी आसेकर, कैवल्य रुद्रे पुरस्काराचे मानकरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सन 2023-24 वर्षाचे उत्कृष्ट कलावंत, आदर्श विद्यार्थी (मुले-मुली) पुरस्कर जाहीर झाले असून श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा ऋषिकेश शंकर दुधाने, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची दिव्या यशवंत बासोले, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची वैष्णवी रंगराव आसेकर आणि शासकीय औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावतीचा कैवल्य कमलाकर रुद्रे या विद्यार्थ्यांची पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे.

Advertisement

ऋषिकेश दुधाने व दिव्या बासोले यांची उत्कृष्ट कलावंत, तर वैष्णवी आसेकर व कैवल्य रुद्रे यांची आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे. पुरस्काराकरीता निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page