अमरावती विद्यापीठात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना http://admission.sgbau.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरुन त्याची एक प्रत केंद्रीय प्रवेश समिती, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचेकडे विहित मुदतीच्या आत सादर करावी लागणार आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

प्रवेश प्रक्रियेविषयीचे वेळापत्रक संकेतस्थळावर दिलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरीता डॉ कपिल कांबळे, अध्यक्ष, केंद्रीय प्रवेश समिती, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांना प्रत्यक्ष संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com