संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बी ए सेमि -1 (सीबीसीएस), एम एस्सी (जीओइन्फॉरमॅटिक्स) एस -4 (सी बी सी एस – नवीन) (सुधारित), एम एस्सी (होम सायन्स) (सर्व शाखा) सेमि -4 (सीबीसीएस) (सुधारित), बी एड् सेमि – 2 (नवीन), एम ई (एफ टी) (सीबीसीएस) सेमि – 2 (इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम इंजिनिअरिंग) आणि बीपीएड् एस-1 (नवीन), एमपीएड्एस – 1 (नवीन) या परीक्षांचा समावेश आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

यासंदर्भात विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली असून तव्दतच सर्वसंबंधित महाविद्यालयांनाही कळविण्यात आले आहे. महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9763833969 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com