रोहित वेमुलाच्या हत्येतील दोषींना निरपराध ठरवण्याच्या कृतीचा एसएफआयतर्फे तीव्र निषेध

सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) रोहित वेमुलाच्या मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांतील तपास अहवालाचा तीव्र निषेध केला आहे. रोहित वेमुलाचा मृत्यू ही शैक्षणिक संस्थांमधील दलित विद्यार्थ्यांशी शासन-प्रणित भेदभावामुळे झालेली संस्थात्मक हत्या होती. कोणीही हे सत्य पुसून टाकू शकत नाही. कोणताही अहवाल ही वास्तविकता बदलू शकत नाही असे एसएफआयतर्फे बोलण्यात आले.

SFI

हा अहवाल रोहित वेमुला याला त्याच्या मृत्यूसाठी दोषी ठरवत आहे आणि हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ (एचसीयू) प्रशासन, कुलगुरू अप्पा राव आणि कॅम्पसमधील अभाविप सदस्य यांच्या दुजाभावामुळे रोहितला स्वतःचा जीव घेण्यास भाग पाडले. या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाला विद्यार्थीविरोधी, दलितविरोधी अहवालासाठी जबाबदार धरले पाहिजे.

ते केवळ जातीवादी प्रशासन आणि सत्तेतील भ्रष्ट नेत्यांना उपेक्षित विद्यार्थी समाजावर दडपशाही करण्यास प्रोत्साहन देत आहेत. अहवालाद्वारे स्वीकारलेली भूमिका देशातील उपेक्षित समुदायांना देऊ केलेल्या कायदेशीर सुरक्षेला कमी करते आणि जातीय हिंसाचारास मान्यता देत आहे.

Advertisement

तेलंगणा पोलिसांच्या अहवालाने रोहित वेमुला या पीडित व्यक्तिमत्त्वास पुन्हा एकदा दोषी ठरवले. विद्यार्थी आणि संशोधक म्हणून त्याची प्रतिमा डागाळून त्यास पुन्हा एकदा ठार केले. यात रोहितवर “अभ्यासापेक्षा कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या राजकीय समस्यांमध्ये जास्त गुंतलेला दिसतो” असा आरोप केला आहे.

लोकशाहीविरोधी कृतींविरोधात आवाज उठवणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याविरुद्ध भाजपसमर्थित हुकूमशाही प्रशासन हेच कथन करते. मतभेद दडपण्याच्या आणि इतिहासाचे पुनर्लेखन करण्याच्या या प्रयत्नांना तोंड देत, आम्ही आमचा तीव्र विरोध व्यक्त करतो आणि तेलंगणा राज्य सरकारने तपास अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी एसएफआय तर्फे करण्यात आली.

व्ही पी सानू (अध्यक्ष, SFI)
मयुख बिस्वास (महासचिव, SFI)

रोहित वेमुलाच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा यासाठी एसएफआय आग्रही आहे. भारतातील शैक्षणिक संस्थांमधील उपेक्षित विद्यार्थ्यांचा सन्मान सुनिश्चित करण्यासाठी रोहित वेमुला कायदा लागू करणे ही काळाची गरज असल्याचे एसएफआय ने अधोरेखित केले. देशाची पुरोगामी विद्यार्थी चळवळ इतिहासाचे पुनर्लेखन होऊ देणार नाही. ऐतिहासिक अन्यायाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही असे एसएफआयतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page