श्री बंकटस्वामी महाविद्यालयात प्रसारमाध्यमांचा समाजावर प्रभाव या विषयी राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालय बीड समाजशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमांचा समाजावरील प्रभाव या एकदिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे सर तर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. कामना दीक्षित मॅडम तर दुसरे प्रमुख व्याख्याते डॉ. रामचंद्र भिसे सर उपस्थित होते. डॉ.कामना दीक्षित मॅडम यांनी प्रसारमाध्यमांचा समाजावर प्रभाव या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. समाजामध्ये सोशल मीडिया एक प्रभावी तंत्र बनले आहे मोबाईलचे व्यसन आज या तरुण पिढीला लागले आहे. सर्व क्षेत्रांमध्ये सोशल मीडिया आज प्रसारित झालेले दिसून येते आणि याचा परिणाम या समाज व्यवस्थेवर होत आहे नवीन पिढी प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलचा वापर करत असल्यामुळे लहान मुलांमध्ये ऑटिझम नावाचा आजार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे रील्स बनवण्याची पद्धत या तरुण पिढी मध्ये आल्यामुळे त्याचाही या समाज व्यवस्थेवर परिणाम होत आहे व्यक्तीमधील दुरावा जरी कमी झालेला असला तरी नात्यांमध्ये मात्र यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण केलेला आहे. व्यक्तीला एकटे राहण्याची सवय या मोबाईल मुळे लागलेली आहे, व्यक्ती व्यक्ती मधील संवाद कमी होताना दिसत आहे तसेच सायबर गुन्ह्याचे प्रमाण हे आज वाढलेले आहे, कारण आपण आपला प्रायव्हेट डाटा या इंटरनेटच्या माध्यमातून शेअर करतो आणि सायबर गुन्हे यांना यामुळे आमंत्रण दिले जाते व्यक्तीने आज एक आभासी जग तयार केलेले आहे, मोबाईल इंटरनेट व्हाट्सअप फेसबुक इत्यादीचा अति वापर केल्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न हे यातून निर्माण होत आहेत, अशा प्रकारे कामना दीक्षित मॅडम यांनी प्रसारमाध्यमांचा समाजावरील प्रभाव यावर आपले मनोगत व्यक्त केले.

तर दुसरे प्रमुख व्याख्याते रामचंद्र भिसे यांनी प्रसार माध्यमांचा समाजावरील प्रभाव व आव्हाने या विषयावर या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आपले मनोगत व्यक्त केले व सर्व माध्यमांचे प्रकार वर्तमानपत्रे वर्तमानपत्रातील लेख यामुळे स्वातंत्र्याची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात गती घेताना दिसत होती स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय प्रभुत्व वृत्तपत्रांवर नव्हते वृत्तपत्रांमध्ये लोकांना व्यक्त होते येत होते परंतु आजच्या काळामध्ये वृत्तपत्रे ही राजकीय मालकीची बनलेली आहेत आणि त्यामुळे या वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा येताना दिसत आहे तसेच चित्रपट जाहिराती इत्यादींचाही प्रभाव या समाज व्यवस्थेवर होत असतो आजची प्रसार माध्यमे सामाजिक प्रश्नावर न बोलता इतर गोष्टींना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देत आहेत परंतु तरीही प्रसारमाध्यमे ही अत्यंत महत्त्वाचे असतात कारण एखाद्या कार्य एखाद्या व्यक्तीचा लढा चळवळीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्या सर्वांचे महत्त्वाची भूमिका पार पडतात तसेच सामाजिक संस्थावर हे या प्रसार माध्यमांचा प्रभाव पडत असतो. समाजाचे प्रतिबिंब चित्रपटात बघायला मिळते तर कधी कधी चित्रपटाचे अनुकरण करून समाज तयार होत असतो या प्रसार माध्यमांच्या चुकीच्या बातम्या प्रसारीत करण्यामुळे कधी कधी धार्मिक दंगली होतात परंतु एखादी बातमी व्यवस्थित रित्या प्रसारित केली तर त्या घटनाचे व्यवस्थितरित्या प्रबोधन करण्याचे काम या प्रसार माध्यमे करतात समाजातील प्रश्न मांडण्याचे कामही या प्रसारमाध्यमामार्फत होत आहे एवढेच नाही तर प्रसारमाध्यमामुळे आपली संस्कृती बदलताना दिसत आहे भौतिक संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल या प्रसारमाध्यमुळे झालेली आपल्याला दिसून येतात एकंदरीतच प्रसार माध्यमे ही समाजामध्ये सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही दृष्टिकोनातून प्रभाव पाडण्याचे काम करत असतात. नकारात्मक प्रभावातून समाजामध्ये कधीकधी आव्हाने निर्माण होत असतात परंतु कोणत्याही समाजात प्रसार माध्यमे ही फार महत्त्वाचे असतात म्हणून प्रसार माध्यमाचे महत्त्व आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागातील प्रा. डॉ. निता बावणे यांनी तर आभार प्रा. डॉ. कुंडलिक खेत्रे यांनी मानले.