संस्कृत विश्वविद्यालयात IOT मध्ये फ्युचर ट्रेंड आणि इनोव्हेशन या विषयावर सेमिनार संपन्न
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या संगणक विज्ञान विभागा द्वारे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी Future Trends and Innovation in IOT या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रो. कीर्ती सदार यांनी केले. ग्रंथपाल डॉ दिपक कापडे यांनी सेमिनार चा विषय हा नाविन्यपूर्ण असून खूप महत्त्वपूर्ण आहे असे आपल्या भाषणात सांगितले.
प्रमुख अतिथी प्रो पंकज आष्टनकर विभाग प्रमुख व डीन किट्स रामटेक यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) सेन्सर, प्रक्रिया क्षमता, सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञानासह उपकरणांचे वर्णन केले जे इंटरनेट किंवा इतर संप्रेषण नेटवर्कवर इतर डिव्हाइसेस आणि सिस्टमसह डेटा कनेक्ट आणि एक्सचेंज कसा केला जाऊ शकतो याचे वर्णन केले तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकी यांचा समावेश आहे असेही सांगितले. तसेच 101 उपकरणांसाठी वायरलेस कनेक्टिव्हिटी कशी करतात याचे दिग्दर्शन करून दाखवले. तसेच 101 मूळे होणारे फायदे आणि तोटे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वविद्यालयाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी सर यांनी संगणक विज्ञान आणि संस्कृत यात समन्वय साधल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अधिक वाव मिळेल असे सांगितले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. मनाली पंडे आणि आभार प्रदर्शन प्रा. स्नेहा आष्टनकर यांनी केले. या प्रसंगी पोस्टर प्रदर्शनी लावण्यात आले होते समन्वयक म्हणून प्रा. सीमा मोहने आणि प्रा. दिव्या बेलेकर यांनी काम पाहिले.