डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये ‘फार्मसी क्षेत्रातील उद्योजकता आणि स्टार्टअप्स’ या विषयावर परिसंवाद संपन्न
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये प्रा महादेवलाल श्रोफ यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय औषधशास्त्र शिक्षण दिन’ अंतर्गत ‘फार्मा आणि फार्मसी प्रॅक्टिसमधील उद्योजकता आणि स्टार्टअप्स’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन बागवडे (संचालक, सॅम फार्मा कोल्हापूर) यांनी फार्मसी प्रॅक्टिसमधील स्टार्टअप्स आणि उद्योजकतेच्या संधींवर सखोल मार्गदर्शन केले.

तसेच या परिसंवादात फार्मसी क्षेत्रातील स्टार्टअप्स सुरू करताना येणाऱ्या अडचणी, गुंतवणुकीच्या संधी, सरकारी योजना व अनुदान, संशोधन व विकासाचे महत्त्व, यावर विद्यार्थ्याशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सतीश किलजे यांनी औषधनिर्माण उद्योगातील संधी व नवसंशोधनाचे महत्त्व महत्त्व पटवून देत, त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्याना प्रेरित केले. यावेळी सॅम फार्मा, कोल्हापूर यांच्यासोबत महाविद्यालयाचा प्लेसमेंटसाटीचा सामंजस्य करार (MoU) देखील झाला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शीतलकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालायकडून असे विविध उपक्रम कायम चालू राहतील असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ विजय मगदूम आणि व्हाईस चेअरपर्सन अॅड डॉ सोनाली मगदूम, आणि संचालक डॉ सुनिल आडमुठे यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कीर्ती यादव हिने केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा सोनल शिरदवाडे यांनी केले. तसेच या कार्यक्रमास डॉ प्रियंका गायकवाड, प्रा प्रणिल तोरसकर इतर शिक्षक उपस्थित होते.