‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘मराठा साम्राज्याचे चलन’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

ललित व प्रयोगजीवी कला संकुलातर्फे सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड : सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त दर्शनिका विभाग (गॅझेटिअर विभाग) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज ३५० वे राज्याभिषेक वर्ष निमित्त ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन दि. २३ मार्च रोजी स.११ ते ५ या वेळेत विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये करण्यात आले आहे.

Advertisement
SRTMUN-Nalanda-Gate-2

परिसंवादाचे उद्घघाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिसंवादात महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि.प्र. बलसेकर तसेच आशुतोष पाटील व डॉ. महेश जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहे.

सर्व सहभागीना शासनातर्फे प्रमापत्र देण्यात येणार आहे. त्याकरिता पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असेल. या परिसंवादात जास्तीत जास्त विद्यार्थी, प्राध्यापक व इतर इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संयोजक प्रा. राहुल गायकवाड (९०४९०४३८९४) व प्रा. कैलास पुपुलवाड (९९२२६५२२०५) यांच्याशी संपर्क साधावा. असे डॉ. तौर यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page