कौशल्यातून स्वयंम रोजगार शक्य – डॉ प्रभाकर कोळेकर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि एमएसएफडीए यांच्याकडून 40 प्राध्यापकांना एकत्रित कौशल्य अभ्यासक्रम कसे तयार करावे, त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने करावयाचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या समारोपावेळी बोलताना पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन कौशल्य युक्त शिक्षण देण्याची गरज निर्माण होत आहे, असे मत डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविकामध्ये व्यक्त केले.
या समारोप कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बोलताना विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांनी कौशल्य आधारित कोर्स तयार करावयाचे आहेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच एमएसएफडीए प्रतिनिधी ऋतुजा तांबे सह समन्वय डॉ. श्रीराम राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी प्रतिनिधि प्रगती कांबळे, डॉ. किरण पारिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ सोनकांबळे, श्रुती देवळे, जयकुमार शिंदे, रविंद्र कोरे, स्नेहा जानकर, विद्या लेंडवे, श्रुती देवळे, सोमनाथ सोनकांबळे, श्वेता गावडे, डॉ. अभिजित जगताप यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार सिस्टम अँनालिस्ट प्रशांत चोरमारे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.