देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 102 विद्यार्थ्यांची विविध उच्च नामांकित कंपन्यामध्ये निवड
महाविद्यालयाच्या यांत्रिक इंजिनिअरींग विभागाच्या 102 विद्यार्थ्यांची विविध उच्च नामांकित कंपन्यामध्ये 6 लाखापर्यंतचे उच्चतम पॅकेज
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल संचलित देवगिरी इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज मधील यांत्रिक इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये 102 विद्याथ्यांची इंटर्नशिप आणि प्रीप्लेसमेंटसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंन्डुरन्स टेक्नॉलॉजीज लि, सिमेन्स इंडिया लि, लीबर आप्लायन्सेस इंडिया प्रा लि, व्हेरॉक इंजिनिअरींग लि, कॉस्मो फिल्म लि, ग्राईंड मास्टर मशीन्स प्रा लि, मॉर्गन क्रुसिबल इंडिया लि, जे बी एम निल मेटल प्रॉडक्टस लि, बेलरिस इंडस्ट्रीज लि, धनंजय ऑटो पार्टस प्रा लि इ उच्च नांमाकित कंपनीमध्ये निवड झाली आहे, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा रु 16000/- पर्यंत स्टायपेंड इंटर्नशिपसाठी यासह प्लेसमेंटसाठी 6 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
ही मुलाखत घेण्यासाठी कंपनीचे एच आर आणि अॅडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. या परीसर मुलाखतीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल रांऊड, ग्रुप डिस्कशन आणि एच आर रांऊड यामधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीसर मुलाखत घेण्यासाठी कंपनीचे एच आर ॲण्ड ॲडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वेक्षक आणि विविध विभागामध्ये काम करण्याची संधी मिळेल.
निवड झालेल्या विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ सचिन बोरसे, डॉ सत्यवान धोंडगे, प्रा संजय कल्याणकर, डॉ गजेंद्र गंधे, डॉ राजेश औटी, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा अमरसिंह माळी, डॉ बापूराव मारल्लापल्ले, प्रा तेजस पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.