उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परिसर मुलाखतीमध्ये पॉलिमर केमिस्ट्रीच्या तीन विद्यार्थ्यांची निवड

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये पॉलिमर केमिस्ट्रीच्या तीन विद्यार्थ्यांची निवड रायगड जिल्ह्यातील सुप्रीम पेट्रोकेम लि या कंपनीसाठी झाली.

एम. एस्सी. पॉलिमर केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी या परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीचे व्यवस्थापक अशिष परांजपे, ए.के. मेटांगळे, विकास मुळ्ये उपस्थित होते. १२ विद्यार्थ्यांपैकी जगदीश पाटील, लौकिक पाटील व केतन मराठे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कक्षाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्ज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी मुलाखतींचे व्यवस्थापन केले. रासयनिकशास्त्र प्रशाळेचे डॉ. अमरदिप पाटील, डॉ. विकास गिते यावेळी उपस्थित होते. कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा. धनंजय मोरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com