उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची सिनॅरिझीया लाईफ सायन्सेस या नामांकित कंपनीसाठी निवड
जळगाव : सिनॅरिझीया लाईफ सायन्सेस, वाडा, मुंबई या नामांकित कंपनीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली.
सिनॅरिझीया लाईफ सायन्सेस, वाडा, मुंबईच्या कंपनीत विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत घेण्यात आलेल्या मुलाखती मध्ये विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील केमिकल इंजि च्या कुष्णा टाके, तेजस पाटील व प्रणव महाजन या तीन विद्यार्थ्यांची ज्युनिअर एक्झुक्युटीव्ह प्रोडक्शन या पदाकरीता निवड झाली आहे. रू ४.६० लाख या वार्षिक वेतनावर या विद्यार्थ्यांची निवड झाली.
कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा अजय गोस्वामी, केमिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा जे बी नाईक, डॉ उज्ज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.