आंतर विद्यापीठ सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निवड

नागपूर : आंतर विद्यापीठ सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूचे गठन करण्यात आले आहे. दीक्षांत सभागृह येथे १९ ते २१ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा निवड चाचणीतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

RTM Nagpur University

संगीत, नृत्य, नाटक, साहित्यिक आणि ललित कला अशा ५ विभागातून २६ कला प्रकाराकरिता विद्यार्थ्यांची निवड चाचणी मधून करण्यात आली आहे. यामध्ये क्लासिकल व्होकल सोलो प्रकारात आर.एस. मुंडले महाविद्यालयाची राधा ठेंगडी, सेमीक्लासिकल सोलो प्रकारात वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्था येथील तेजस्विनी खोडतकर, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल पर्स्युसन प्रकारात वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्था येथील सुयोग देवळकर, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल नाॅनपर्स्युसन प्रकारात हिस्लाॅप कॉलेजची निधी भालेराव, लाईट व्होकल सोलो प्रकारात एलईडी महाविद्यालयाची आयुशी देशमुख तर ग्रुप सॉंग इंडियन प्रकारात राधा ठेंगडी, तेजस्विनी खोडतकर, आयुषी देशमुख, इंद्रायणी इंदुरकर, निधी रानडे, निधी इंगोले, सुयोग देवळकर, निधी भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. 

Advertisement

वेस्टन व्होकल सोलो प्रकारात सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेजचा क्षितिज मेश्राम, वेस्टन इन्स्ट्रुमेंटल सोलो  प्रकारात हिस्लाॅप कॉलेजचा जोश लाल, फोक आर्केस्ट्रा प्रकारात वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्था येथील सुयोग देऊळकर व समीक्षा परचाके, हिस्लाॅप कॉलेजची निधी भालेराव, श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा याद्विक भंगाळे, सिटी प्रीमियर कॉलेजचा मधुर बक्षी, ग्रुप सॉंग वेस्टन या प्रकारात सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेजचा क्षितिज मेश्राम, श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे आदी रिंगे व अनुज गुप्ता,  हिस्लाॅप कॉलेजचे अमांडा सायमन्स, अक्सा बेंजामिन व जोश लाल, वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्थेची धनश्री यांचा समावेश आहे. क्लासिकल डान्स प्रकारात हिस्लाॅप कॉलेजची कल्याणी चिकुलवार तिची निवड करण्यात आली आहे. 

थिएटर कला प्रकारात व्हिएमव्ही कॉलेजचा शशांक रहांगडाले व युगलहंस मकराम, हिस्लाॅप कॉलेजचा मोहित सरकार, चिराग शुक्ला व शिफा अन्सारी, विद्यापीठाच्या ललित कला विभागातील निधी नहाटे, जी. एस. कॉलेजची तानिया पंडित यांचा समावेश आहे. मिमिक्री कला प्रकारात हिस्लाॅप कॉलेजचा ब्रायन डोंगरदिवे, डिबेट प्रकारात हिस्लाॅप कॉलेजची मेहंदी शेख व विद्यापीठाच्या हिंदी विभागातील विशाल खर्चवाल यांची निवड करण्यात आली आहे.

विज प्रकारात जीएस महाविद्यालयातील प्रथमेश लांजेवार, हिस्लाॅप कॉलेजची अनुष्का नाग तर जी एच रायसोनी कॉलेजचा राहुल नायर यांची निवड करण्यात आली आहे. स्पॉट पेंटिंग प्रकारात शासकीय कला महाविद्यालयातील यश वानखेडे, पोस्टर मेकिंग प्रकारात रणजीत वानखेडे, कोलाज प्रकारात मृणाली कांबळे, कार्टूनिंग प्रकारात हर्षद लिखार, क्ले मॉडलिंग प्रकारात अपूर्वा ताकसांडे, रांगोळी प्रकारात सायली गडकरी, स्पॉट फोटोग्राफी प्रकारात प्रणय नेताम तर मेहंदी प्रकारात प्रियदर्शनी जेल कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी गणेश्वरी निर्मळकर हिची निवड करण्यात आली.

अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page