उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये ल्यूपीन लि या कंपनीत निवड

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये जैवशास्त्र प्रशाळेतील एम एस्सी (मायक्रोबॉयोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री) ह्या विषयांच्या आठ विद्यार्थ्यांची मुंबई येथील ल्यूपीन लि या कंपनीत निवड झाली आहे.

या परिसर मुलाखतीसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या त्यात विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील प्रथमेश खंडारे, पंकज वाणी, योगेश बाविस्कर, प्रतिक शिंपी, प्रतिम उईके, हर्षवर्धन दाभाडे, वैष्णवी पाटील आणि दिपीका पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. कंपनीचे व्यवस्थापक श्रीरंग कानडे यांनी मुलाखती घेतल्या.

यावेळी जैवशास्त्र प्रशाळेचे विभाग प्रमुख प्रा भुषण चौधरी व जैवशास्त्र प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक डॉ नवीन दंदी उपस्थित होते. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा अरूण इंगळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com