देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 72 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल संचलित देवगिरी इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज मधील कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरींग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग) विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये 72 विद्याथ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मिडलीड टेक्नोव्हेशन्स, डेव्हिटोन आणि कॅपजेमिनी, फाईन्डबिलिटी सायन्स, सिमेन्स, अलरीच कॅपिटल, कॅलेव्हरपे, फॉक्सट्रेडिंग, नेक्सस, अलुमेटेक, सुमगो इन्फोटेक इ. नांमाकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.
ही मुलाखत ऑनलाईन घेण्यासाठी कंपनीचे एच आर आणि अॅडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. या परीसर मुलाखतीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेकनिकल रांऊड, ग्रुप डिस्कशन आणि एच आर रांऊड अशातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीसर मुलाखत घेण्यासाठी कंपनीचे एच आर ॲण्ड ॲडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते.
निवड झालेल्या विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके, सचिव सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ शोएब शेख, प्रा संजय कल्याणकर, डॉ सत्यवान धोंडगे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ राजेश औटी, डॉ सचिन बोरसे, डॉ रुपेश रेब्बा, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा अमरसिंह माळी व प्रा अनिल रोकडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.