उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहा विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे निवड
हकदर्शक एम्पावरमेंट सोल्युशन प्रा लि, नाशिक या कंपनीसाठी झालेल्या परिसर मुलाखतीद्वारे निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने हकदर्शक एम्पावरमेंट सोल्युशन प्रा लि, नाशिक या कंपनीसाठी झालेल्या परिसर मुलाखतीद्वारे समाजकार्य विषयातील सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. २० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. यामधून वासुदेव बारी, साधना बारी, जीवन कोळी, पुजा वाघीले, मोहित बाविस्कर आणि करीश्मा भामरे या सहा जणांची निवड करण्यात आली. कंपनीचे अधिकारी राहुल शिंदे, उमेश बडगुजर, पुजा मात्रे यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतींचे व्यवस्थापन कक्षाचे उपसमन्वयक डॉ उज्ज्वल पाटील, समन्वयक प्रा रमेश सरदार, सामाजिकशास्त्र प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक डॉ उमेश गोगाडिया, प्रा वर्षा पालखे, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी केले. कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, सामाजिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा अजय पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.