एमजीएमच्या कलाकृतीची द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनासाठी निवड
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनमधील फाईन आर्ट शाखेतील अंतिम वर्षात शिकत असलेल्या रंगनाथ वेताळच्या कलाकृतीची प्रतिष्ठेच्या द आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातील उत्कृष्ट कलावंत आणि कलाकार विद्यार्थ्यांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात येतात.
त्याने वेळेच्या महत्वासंदर्भात काढलेले सृजनात्मक चित्र `टाईम मॅनेजमेंट` हे तज्ज्ञांच्या समितीने या प्रदर्शनासाठी निवडले आहे. या चित्रासाठी अॅक्रेलिक रंगांच्या सहाय्याने कॅनव्हासवर काढले आहे. रंगनाथ हा प्रामुख्याने सृजनात्मक कला प्रकारात वैशिष्ट्यपूर्णपणे काम करतो. त्याच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी त्याचे कौतुक केले आहे. विद्यार्थी रंगनाथ वेताळ याच्यासह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. राजेश शाह, डॉ.आयुशी वर्मा, प्रा. माखनलाल विश्वकर्मा, प्रा. सचिन कांबळे यांचे रंगनाथ वेताळ याला मार्गदर्शन लाभले.