विझी ट्रॉफीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चार क्रिकेटपटूंची निवड

जळगाव : दिनांक १० ते १६ मार्च या कालावधीत गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या विझी ट्रॉफीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चार क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. नुकत्याच जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत यजमान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विजेतेपद पटकावले होते.  या संघातील तुषार चोरडीया (पी.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), सौरभ सिंग (मु.जे.महाविद्यालय, जळगाव), नचिकेत ठाकुर (जी.एच.रायसोनी महाविद्यालय, जळगाव), नीरज जोशी (केसीई आय.एम.आर. महाविद्यालय, जळगाव) या चार खेळाडूंची निवड विझी ट्रॉफीसाठी झाली आहे.

Advertisement

बीसीआय मार्फत होणाऱ्या या विझी ट्रॉफी स्पर्धेत पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागातून निवडलेले संघ सहभागी होत असतात. एआययु चे निरीक्षक डॉ.राजेश सोबती यांनी ही निवड केली आहे. खेळाडूंच्या या निवडीबद्दल कुलगुरु प्रा. व्ही. एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे यांनी खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक डॉ.सचिन झोपे, संघ व्यवस्थापक डॉ. आनंद उपाध्याय यांचा सत्कार केला. क्रिडा संचालक डॉ. दिनेश पाटील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page