राज्यस्तरीय युवा महोत्सवातील लोकगीत स्पर्धेसाठी लोकगीतव प्रयोगजीवी कला विद्यार्थ्यांची निवड
नांदेड : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा कार्यालय नांदेडच्या वतीने आयोजित जिल्हा युवा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवात लोकगीत समूह, संगीत, नृत्य, चित्रकला, वक्तृव इ. कला प्रकारांचा समावेश होता. लोकगीत (समूह) या कला प्रकारात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या विदयार्थ्यांची निवड दि. ८ डिसेंबर रोजी लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालय येथील विभागीय महोत्सवासाठी झाली होती. या महोत्सवात सुध्दा ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील विद्यार्थ्यांनी अस्सल मराठमोळे पारंपरिक लोकगीत सादर करून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
या यशस्वी विदयार्थ्यामध्ये प्रशांत चित्ते, तुषार वडने, मीनाक्षी आडे, प्रियंका कोल्हे, मृण्मयी अग्रवाल, पल्लवी डोईबळे, श्रीनिवास लंकावाड, ओमकार गायकवाड, समाधान राऊत, गणेश इंगोले या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी झाली आहे.
या विदयार्थ्यांना प्रा.डॉ. शिवराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. पांडूरंग पांचाळ हे होते.
विभागीय स्तरावर मिळालेल्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक प्रो.डॉ. पृथ्वीराज तौर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, संगीत विभागातील प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. किरण सावंत, प्रा. प्रशांत बोंपीलवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.