डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अमेरीकेतील नामांकित विद्यापीठात निवड

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या कशिश ललवानी हीची विविध पाच विद्यापीठांमध्ये निवड झाली असून सोबत मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. कशिश हीची जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे “ग्लोबल लीडर्स अवॉर्ड” आणि १७,१०० डॉलर शिष्यवृत्ती, ⁠युनिव्हर्सिटी ऍट बफेलो ⁠स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “मास्टर्स स्कॉलरशिप अवॉर्ड” आणि २५ हजार डॉलर्स शिष्यवृत्ती ,⁠युनिव्हर्सिटी ऍट अल्बानी येथे “डीन मेरिट अवॉर्ड” आणि प्रति सेमेस्टर २५०० डॉलर्स शिष्यवृत्ती, आणि स्टोनी ब्रूक आणि स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे प्रवेश मिळाला आहे. महाविद्यालयाचा “सर्वोत्तम विद्यार्थिनी” पुरस्काराने सन्मानित कशिश हीने न्यूयॉर्क, यूएसए येथील “स्टोनी ब्रूक” विद्यापीठात डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम एस) करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

स्मित नलावडे याची स्टीवन्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि हॉबोकेन न्यु जर्सी येथे निवड झाली आहे, त्याला १०हजार डॉलर्स शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर प्रसाद बापट याची निवड बुफ्फालो युनिव्हर्सिटी, न्युयार्क, यु एस ए येथे झाली असून डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम एस) करणार आहेत.

डी वाय पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयतुन बी टेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभागाच्या पाहिल्याचं २०२०-२४ बॅचच्या या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ सिद्धेश्वर पाटील आणि विभागातील शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page