डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’मध्ये इंटर्नशिपसाठी निवड

कसबा बावडा : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो)च्या अहमदाबाद, बंगळूरु येथील सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

Selection of DY Patil engineering students for internship in ISRO
इस्रो इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना डॉ ए के गुप्ता. सोबत डॉ टी बी मोहिते-पाटील, प्रा प्रांजल फराकटे आदी.

महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी शिवदत्त मारुती मिरजकर याची अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (SAC) येथे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यानंतर तो एनालॉग डोमेन मध्ये काम करणार आहे. ज्यात कंट्रोल सिस्टीम आणि नेटवर्क एनालेसिसचा समावेश आहे. तर याच विभागाच्या चिराग नेवारे ,अभिषेक चव्हाण, शार्दुल पाटील यांची लॅबोरेटरी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इस्रो बेंगलोर या ठिकाणी निवड झाली आहे. या ठिकाणी ते फायबर ऑप्टिक्स, अर्थ लॅब, सन लॅब यासारख्या डोमेन मध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहेत. तर आर्टीफिशियल इंटेलीजन्स अँड मशीन लर्निग विभागच्या सायली पुंडपाल हिचीही या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

Advertisement

विभागप्रमुख डॉ टी बी मोहिते-पाटील, डॉ सिद्धेश्वर पाटील यांच्यासह मेंटर्स प्रो प्रांजल फराकटे, डॉ मनीषा भानुसे, शिवचंद्र खोत, रोहिणी गायकवाड आणि इतर प्राध्यापकांचे त्याला मार्गदर्शन लाभले

या यशस्वी निवडीसाठी सस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ लितेश मालदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page