देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३५ विद्यार्थ्यांची TCS कंपनीमध्ये निवड
छत्रपती संभाजीनगर : अलिकडील कॅम्पस भरती मोहीमेत विविध अभियांत्रिकी शाखेतील ३५ विद्यार्थ्यांनी TCS मध्ये प्रतिष्ठीत पदे मिळविली.व त्यांचे वार्षिक पॅकेज हे ४ लाख ते ८ लाखांपर्यंत असणार आहे. हे यश शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योग सरेखित अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांना आधुनिक कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक कौशल्यासह सुसज्ज करण्यासाठी डिझाईन केलेले मजबुत प्रक्षिशण कार्यक्रम यासाठी संस्थेची वचन बध्दता अधोरेखित करते.
देवगिरी इंजिनिअरींगचे प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष लहाने यांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा प्रचंड अभिमान व्यक्त केला “आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रतिभा आणि समर्पण दाखवले आहे. TCS मधील यशस्वी प्लेसमेंट त्यांच्या मेहनतीचे आणि त्यांना येथे मिळालेल्या शिक्षणांची गुणवत्ता दर्शवितात. आमच्या विद्यार्थ्यांची क्षमता ओळखुन त्यांना ही संधी दिल्याबद्दल आम्ही TCS चे आभारी आहोत”
देवगिरी इंजिनिअरींगचे ट्रेनिंग ॲण्ड प्लेंसमेंटचे डिन प्रा संजय कल्याणकर म्हणाले की भरती प्रक्रियेमध्ये अनेक टप्यांचा समावेश होतो, जसे की, अभियोग्यता चाचण्या, तांत्रिक मुलाखती आणि एच.आर. मुलाखती ज्या कॅम्पसमध्ये अंखडपणे आयोजित केल्या गेल्या. निवडलेले विद्यार्थी TCS सह त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला सुरवात करतील, विविध नाविण्यपुर्ण प्रकल्प आणि तांत्रिक प्रगतीमध्ये योगदान देतील.
देवगिरी इंजिनिअरींगचे प्लेंसमेंट ऑफिसर प्रा अमरसिंह माळी म्हणाले यावर्षीच्या प्लेसमेंट सिझनच्या निकालाने आम्ही समाधानी आहोत. TCS सोबतचे आमचे सहकार्य शैक्षणिक शिक्षण आणि उद्योगाच्या गरजा यांच्यातील अंतर भरवुन काठण्यासाठी महत्वपुर्ण ठरले आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमचे विद्यार्थी त्यांच्या भुमिकेत उत्कृष्ट कामगिरी करतील आणि TCS मध्ये महत्वपुर्ण योगदान देतील.
निवड झालेल्या विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष लहाने, ट्रेनिंग ॲण्ड प्लेंसमेंटचे डिन प्रा संजय कल्याणकर, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा अमरसिंह माळी, विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ सचिन बोरसे, डॉ आरती वाढेकर, डॉ सुगंधा नांदेडकर, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, अच्युत भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.